सोलापूर – शहरात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेचा उत्सव सर्वत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोन्या मारुती चौकातील मानाचा सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळांने सोन्या मारुती गणरायांना सिद्धरामेश्वर यात्रेत नंदीध्वजधारक परिधान करीत असलेले फेटा बाराबंदी धोतर मानाचा कागदी हार घालण्यात आल्याने सोन्या मारुती गणरायांचे रुप विलोभनीय दिसत आहे.
दरम्यान, या मार्गावरून अक्षता सोहळा तसेच होम प्रदीपन आणि दारूकाम या धार्मिक विधीसाठी नंदीध्वजांची मिरवणूक मार्गस्थ होत असते. त्यामुळे भाविकांना सोन्या मारुतीचे आकर्षक विलोभनीय दर्शन पहावयास मिळाले आहे.



















