सोलापूर – तेलुगु भाषिक महिलांनी ‘बोम्मारिल्लू’द्वारे संस्कृतीचा वारसा व परंपरा जपले आहे, याचा अभिमान वाटतो. अनेक वर्षांपासून लहानसहान भांडे खरेदी करुन त्याद्वारेच ‘बोम्मारिल्लू’ साकारतात. आधुनिक काळातही ‘बोम्मारिल्लू’ साकारत नवीन पिढीला एकप्रकारे कळत न कळत संस्कार देण्याचा प्रयत्न पालकवर्ग करतात असे मनोगत सोलापूर जिल्हापरिषदेच्या उपशिक्षणाधिकारी स्मिता श्रीधर नडीमेटला यांनी व्यक्त केल्या.
स्पर्धकांनी आकर्षक रांगोळी काढून, विविध कलाकुसरीतून ‘बोम्मारिल्लू’ साकारले होते. विजेत्यांची नावे याच कार्यक्रमात स्मिता बंडी यांनी घोषित केल्या. प्रथम क्रमांकासाठी विजेत्या ठरल्या सौंदर्या गोविंद कोटा, द्वितीय क्रमांकासाठी निर्मला वासुदेव बुरा, तृतीय क्रमांक म्हणून सरस्वती माणिक मुटकिरी यांची निवड केले. ‘उत्तेजनार्थ’ म्हणून 1 – अमला श्रीकांत कोक्कूल, 2 – खुशी श्रीनिवास कैरमकोंडा तर 3 – कल्याणी विनायक उय्याला यांनी पारितोषिक पटकावल्या.
व्यासपीठावर माजी नगरसेविका राधिका दत्तू पोसा, रोजा मनोज पिस्के, परिक्षक स्मिता हरिप्रसाद बंडी, पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी अंबादास पेनगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेसाठी इतर भाषिक समाजाच्या सपना गणेश शालगर आणि वैष्णवी आनंद शिंदे यांनी सहभाग घेतल्याबद्दल प्रोत्साहनपर अंबादास नारायण पेनगोंडा यांनी त्यांच्यातर्फे आकर्षक बक्षीस देण्याची घोषणा केले. प्रथम क्रमांकासाठी श्रीधर सुरा यांच्याकडून आकर्षक ‘लेडीज वॉच’, द्वितीय शामला मुरलीधर अल्ले यांच्या तर्फे ‘प्रवासी बॅग’, तृतीय राधिका दत्तू पोसा तर्फे ‘इस्त्री’ तर मनोज पिस्के सखी फॅशन कॉर्नर तर्फे आकर्षक बक्षीस देण्यात आले.
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. हेमा मैलारी यांनी सूत्रसंचालन, गीता भूदत्त स्वागत, प्रास्ताविक सविता येदूर यांनी केले. शेवटी आभार वनिता सुरम यांनी मानले. यावेळी पल्लवी संगा, मनोज पिस्के, वैकुंठम् जडल, ओमसी पल्ली यांच्यासह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















