सोलापूर – अनेक दिवसांपासून प्रशासन राज्य असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बारा पंचायत समिती गणासाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली .
पंचायत समितीच्या सहा जागा या महिलांसाठी राखीव झाले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बारा पंचायत समिती गणासाठी रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रांतधिकारी सुमित शिंदे आणि तहसीलदार तहसीलदार किरण जमदाडे यांच्या प्रमुख उपस्थित काढण्यात आले. यावेळी वोरोनोको प्रशालेतील सुमित शिंदे(वय १०)सुशील काळे( वय १२) या मुलांच्या हातून चिठ्ठी काढण्यात आली.
पंचायत समितीचे आरक्षण
सर्वसाधारण …
हत्तूर,औराद,कुंभारी, कासेगाव:
मंद्रूप: ओबीसी
कंदलगाव व होटगी: सर्वसाधारण महिला
भंडारकवठे: अनुसूचित जमाती महिला
निंबर्गी: अनुसूचित जाती महिला
वळसंग:अनुसूचित जाती
धोत्री व बोरामणी: ओबीसी महिला
..,,
या मतदारसंघात चुरस
..
दक्षिण सोलापूरचे सभापतीपद सर्वसाधारणसाठी राखीव असल्याने सर्वसाधारण आरक्षण असणार्या मतदारसंघात चुरस असणार आहे. यामध्ये हत्तूर,औराद,कुंभारी, कासेगाव यांचा समावेश आहे. मात्र या मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार ? हे निश्चित नाही.
…