अक्कलकोट – अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील विविध गावात हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी रुद्र भूमी करीता जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद संचानालय मुंबई यांच्या पत्राच्या संदर्भान्वये मुख्याधिकारी अक्कलकोट नगरपरिषद व तहसीलदार अक्कलकोट यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात असे नमूद केले आहे की अक्कलकोट शहरांमध्ये हिंदू वीरशैव लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असून समाजासाठी शासनाकडून रुद्र भूमी करिता जागा उपलब्ध नाही भविष्यातील लोकसंख्या वाढीच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून हिंदू वीरशैव लिंगायत समाजाकरिता रुद्रभूमी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाप्रसंगी समाजाचे अध्यक्ष प्रशांत लोकापुरे, सत्यजित लोके, दत्तकुमार साखरे, शिवकुमार कापसे, प्रमोद लोकापुरे, स्वामीनाथ धनशेट्टी, नीलकंठ कापसे, विलास कोरे, राजशेखर हिप्परगी, मल्लिकार्जून आळगी, कांतु धनशेट्टी गजानन पाटील, अप्पू रोडगे, वीरेंद्र पाटील, लक्ष्मण समाने, दयानंद बिडवे, दयानंद रोडगे, राजू थंब, कलबुर्गी , मल्लिनाथ खुबा, प्रितीष किलजे, दसले, शरणू इचगे, संतोष जमगे, रितेश लोकापुरे, संजय कोठे, संजय लोकापुरे, संजय हरकुड, रमेश वाले, श्रीशैल फताटे चन्नु फताटे, शिवकुमार पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.