उमरी तालुक्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर .
*तहसीलदार प्रशांत थोरात यांचे जाहीर अव्हाण
उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्यातील मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम दि . २६ जुन पासून बीएलओ घरोघरी भेटी देवून करणार पडताळणी व या दरम्यान नव मतदारांची नोंदणी करणार तसेच मयत, दुबार मतदारांची नावे वगळली जाणार आहे तरी उमरी तालुक्यातील नागरीकांना जाहीर अव्हान आहे की मतदार यादीचे विशेष संक्षीप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला यांची नोंद घ्यावी नाव नोंदणी , दुरुस्ती करून घ्यावे असे आवाहन उमरी तहसीलदार प्रशांत थोरात यांनी केले आहे .
मतदार यांदी प्रक्रिया या प्रमाणे २५जुलै रोजी प्रसिद्ध होणार एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी
• २५जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत प्रारूप यादीवर दावे व हरकती दाखल करता येणार
• मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी २० ऑगस्टला होणार
भारत निवडणूक आयोगाने १जुलै २०२४ या अर्हता दिनाकांवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा (दुसरा) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २५ जून २०२४ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याद्वारे घरोघरी भेटी देवून मतदारांची पडताळणी केली जाणार आहे , या दरम्यान नव मतदारांची नोंदणी व दुबार,मयत मतदारांचे नाव वगळली जाणार आहेत त्याच बरोबर मतदारांचे योग्य प्रकारे फोटो मतदार यादीत अद्यावत केले जाणार आहेत तसेच मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी २५ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या काळातील शनिवार, रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत राहणार असून २० ऑगस्ट २०२४ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे.
१ जुलै २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे सर्व नागरिक मतदार म्हणून नाव नोंदणीस पात्र होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अथवा अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसल्यास, अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदवता येणार आहे.
तरी ८९ नायगाव विधानसभा मतदारसंघातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांनी या मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती स्वाती दाभाडे, मतदार नोंदणी अधिकारी, ८९ नायगाव विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी तहसीलदार प्रशांत थोरात यांनी केले आहे