माढा : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब यांनी आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी अरण येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
याप्रसंगी संत सावता महाराजांच्या मंदिर परिसराची याचबरोबर महाराजांची विहीर शेती याविषयीची माहिती घेऊन शासनाच्या वतीने विकास आराखड्याच्या माध्यमातून मंदिराच्या केला जाणारा विकास याविषयीची माहिती घेतली.
यावेळी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या व्यक्तीप्रमाणे कर्मातूनच ईश्वराची पूजा करण्याचा संत सावता महाराजांनी दिलेला संदेश याची अनुभूती समाधीच्या दर्शनाने मिळाल्याचे फुलारी साहेब यांनी सांगितले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज सावता महाराज वसेकर प्रभू महाराज माळी यांचे सह सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे सह अरणगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

















