सोलापूर – ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे यांचे द्वारा घेण्यात आलेल्या वास्तू विशारद पदवी परीक्षेत सौ स्मिता देशपांडे यांना विशेष योग्यता मिळाली असून यासाठी त्यांना प्रख्यात वास्तुगुरु वेदमूर्ती डॉ उमेश कुलकर्णी पुणे यांचे मार्गदर्शन लाभले,
ही पदवी त्यांना पुणे येथे पंचम पदवीदान समारंभात प्रख्यात वास्तुगुरु डॉ दिलीप नहार,वेदमूर्ती डॉ उमेश कुलकर्णी यांचेकडून प्राप्त झाली.
या समारंभास जगप्रसिद्ध वास्तुगुरु डॉ नरेंद्र सहस्त्रबुद्धे,ज्योतिर्विद अष्टेकर गुरुजी,वेदमूर्ती गोपाळ जोशी ,वेदमूर्ती वैभव कुलकर्णी हे विशेष अतिथी उपस्थित होते.
























