तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : रेल्वेने वेलांकन्नी महोत्सव २०२५ मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सोलापूर विभागातील ३ स्थानकांवरून मुंबई ते वेलंकन्नी दरम्यान ८ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सोलापूर रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
एलटीटी मुंबई-वेलांकन्नी विशेष गाड्या ४ फेऱ्या असतील. यामध्ये ट्रेन क्रमांक ०११६१ विशेष ट्रेन २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजता एलटीटी मुंबईहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता वेलांकन्नी येथे पोहोचेल. ट्रेन ०११६२ विशेष ट्रेन २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६ वाजता वेलांकन्नी येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.२० वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल. ट्रेन ०११६३ ही विशेष गाडी ७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता एलटीटी मुंबईहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी ३ वाजता वेलांकन्नी येथे पोहोचेल. ट्रेन ०११६४ ही विशेष गाडी ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता वेलांकन्नी येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.२० वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल.
Post Views: 15