सोलापूर : सोलापूरातील अग्रगण्य विकास सहकारी बँकेतर्फे ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर ह्यांच्या वाग्यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडे सहा ते साडे आठ ह्यावेळेत हेरिटेज लॉन्स, गांधीनगर येथे प्रवचने संपन्न होतील. २००९ पासून प्रतिवर्षी चैतन्य महाराजांची ज्ञानेश्वरीतील विविध विषयांवर सोलापूरात प्रवचने होत असून ह्यावर्षी म्हणोनि जेथ श्री श्रीमंतु अर्थात (कर्तृत्व आणि कृपा) ह्या अठराव्या अध्यायातील ओवीवर महाराज सलग तीन दिवस विवेचन करतील.
गेल्या दोनशे वर्षांपासून ज्ञानेश्वरी सेवा आणि चातुर्मासात पंढरीत वास्तव्य ही देगलूरकर घराण्याची परंपरा आहे, त्यांचे निष्ठापूर्वक जतन आणि संवर्धन करण्याचे काम चैतन्यमहाराज करीत आहेत. आजपर्यंत महाराजांनी ज्ञान,भक्ती, कर्म, मन,बुद्धी, अहंकार, दैवी संपत्ती,गुरू महिमा,पसायदान अशा वैविध्यपूर्ण विषयांवर मांडलेले अभ्यासपूर्ण चिंतन सोलापूरकरांच्या पसंतीस उतरले आहे.
विकास सहकारी बँक सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक असून मागील 25 वर्षापासून सतत 12 टक्के लाभांश देणारी व अ वर्ग मिळवणारी बँक आहे. बँकेचा नेट एन पी ए शून्य टक्के आहे.बँकेने व्यवसाय आणि नफ्यात लक्षणीय प्रगती केली असून जाणकार संचालक,निष्णात स्टाफच्या सहयोगाने बँक यश किर्ती शिखरावर विराजमान आहे. मागील 22 वर्षापासून प्रतिवर्षी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या त्रीदिवसीय वाग्यज्ञाचे आयोजन बँकेमार्फत केले जात असे.
यावर्षी बँकेने आयोजित केलेल्या चैतन्य महाराजांच्या तीन दिवस संपन्न होणाऱ्या वाग्यज्ञास सर्व बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे चेअरमन कमलकिशोर राठी,ज्येष्ठ संचालक राजगोपाल मिणियार आणि सर्व संचालकांनी केले आहे.

















