धाराशिव – वाशी जिल्हा धाराशिव येथे ब्रह्मकुमारी द्वारा आयोजित विशेष कार्यक्रम जीवन का आधार गीता का सहार यावर आदरणीय राज योगिनी ब्रह्माकुमारी उषा दीदी जी आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्ता माउंट आबो राजस्थान यांनी एक तास प्रवचन केले. प्रवचनात त्यांनी श्रीमद भगवत गीतेचे अद्भुत रहस्य समजून सांगितले. पारिवारिक शांतीची व परमात्म्याची अनुभूती करून घेतली. वर्तमान काळात संघर्षमय जीवनाचे परिवर्तन करून सुखाचे व शांतीचे जीवन कसे बनवायचे आहे या विषयावर व्याख्यान दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय राज योगिनी ब्रह्माकुमारी सोमप्रभा दीदी जी संचालिका उपक्षेत्र सोलापूर ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्षा सौ विजयाताई गायकवाड उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे माजी नगराध्यक्ष नितीन तात्या चेडे, भरवे साहेब कृषी अधिकारी श्रीमती उमा देवी बाराते, डॉक्टर दत्तात्रय कवडे,ऍड शांता देशमुख , भारत बाप्पा मोळवणे, ऍड वीरेंद्र पाटील, डॉक्टर दयानंद कवडे, ऍड प्रदीप देशमुख, छगन नाना मोळवणे सह गावातील पुरुष व महिला हजरच्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी सोलापूर, धाराशिव, येरमाळा,तेरखेडा, व वाशी परिवार हजर होता. सुरुवातीस प्रजा पिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सोलापूर सबजोनच्या ब्रह्माकुमारी सोमप्रभा दीदी जी च्या हस्ते वाशी येथील सैलानी बाबाच्या पुढे ब्रह्मकुमारी गीता पाठ शाळेचे भूमिपूजन करण्यात आले. सोबत मोठ्या संख्येने ब्रह्मकुमारी परिवार उपस्थित होता. त्या जागेवर दीदी जींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वाशी सेंटर वर उषा दीदींचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रजालीत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ शाल व फोटो देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय धाराशिव वाशीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुरेश बाप्पा कवडे, व नितीन चेडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रह्माकुमारी शारदा मोळवणे, छबुबाई कुदळे व इतर ब्रह्माकुमारी खूपच परिश्रम घेतले.


























