पोदार – इंटरनॅशनल स्कूल धाराशिव येथे विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला वाव मिळावा तसेच त्यांच्या अंगी असलेले वैचारिक दृष्टिकोन बाहेर पडावेत यासाठी स्कूलचे प्राचार्य डॉ.वाल्मिक सोमासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कला प्रदर्शनाचे (आर्ट एक्झिबिशन) चे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डीआरडीएस सोलापूर येथील श्री धर्मेश टंक सर, तसेच श्रीमती सौम्याश्री पूजा मॅडम, श्री शिवकुमार स्वामी सर प्रादेशिक कला सुविधा लातूर हब, आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर स्कूलचे प्राचार्य डॉ. वाल्मिक सोमासे सर, उपप्राचार्य निलेश जाधव सर, व्यवस्थापकीय श्री जीवन कुलकर्णी सर, उप व्यवस्थापकीय अधिकारी श्री प्रदीप शिंदे सर, वरिष्ठ समन्वयक श्री प्रभाकर चौधरी सर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आली.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता प्रत्येकाने आपापल्या कलेचे प्रदर्शन करून त्याचे सादरीकरण अतिशय देखण्या स्वरूपात केले. या कार्यक्रमाला पालक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन कार्यक्रमाधिकारी दीपक अंकुश सर यांनी केले.






















