नांदेड – जिल्हा पोलिस व मुक्रमाबाद पोलिस ठाणे तर्फे दि.३१ रोजी राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी मँरेथान आयोजित करण्यात आली होती.
हि मँरेथान नांदेड – बिदर- राष्ट्रीय महामार्गावरील लखमापूर फाटा ते डोरनाळी पर्यंत काढण्यात आली.यावेळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राजू चव्हाण यांनी रन फॉर युनिटी मँरेथान बद्दल माहिती सांगून मँरेथान ला सूरुवात केली
याप्रसंगी धिरज पाटील गोजेगावकर, कपिल पाटील ईटग्याळकर, जयपाल दापकेकर, नामदेव सुर्यवंशी, हेमंत खंकरे, बालाजी पसरगे, अँड.सुरेश राचलवार, पोलिस पाटील सुनील रोठेवाड, संतोष वट्टमवार, पत्रकार अशोक लोणीकर, रज्जाक कुरेशी,शाकेर काझी, बस्वराज वंटगीरे,आदिनी रन फॉर युनिटी मँरेथान मध्ये सहभाग नोंदवला.
आयोजित रन फॉर युनिटी मँरेथान यशस्वीतेसाठी ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू चव्हाण साहेब, गोपनीय शाखेचे माधव मलगीरवार, दिलिप तग्याळकर, गजानन ढगे, योगेश महेंद्रकर, सुभाष सिद्धेश्वरे, बबरुवान लुंगारे, माधव जळकोटे, लायकोनिसा शेख,सुनिता गज्जलवाड,सुहानी पंचबुद्धे. आदी पोलिस कर्मचारी सहभागी होऊन परिश्रम घेतले.
 
	    	 
                                




















 
                