सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंडळ (सोमपा) यांच्या वतीने आज सोलापूर महानगरपालिका परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त चांगला प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेश देवकर, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक सत्यजित वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बेसे, उपायुक्त आशिष लोकरे यांनी शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. महापालिकेच्या आवारात अशा सामाजिक उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयुक्तांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. शिवजन्मोत्सव मंडळाचे अथक परिश्रम हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव मंडळाचे संस्थापक माऊली पवार, अध्यक्ष प्रभुलिंग पुजारी, सल्लागार प्रदीप जोशी,
सदस्य सोहन माने, मेघराज साळुंखे, सौरभ सांगवे, श्रीकांत घोलप, दत्ता गायकवाड, महादेव ढेकणे, श्रीकांत भडके, श्रीनिवास रामगल, गणेश डेंगळे, विक्रम पाटील, अमृत हावळे आणि सतीश कोळी यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले:

























