तभा फ्लॅश न्यूज/ कन्नड : हिवरखेडा गौताळा येथील इसम धारसिंग धरमु जाधव वय 33 वर्ष यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली कन्नड ग्रामीण रुग्णालयात काही काळ वातावरण तापले होते. डॉ.रुपेश माटे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. हिवरखेडा गौताळा येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारसिंग जाधव हे हिवरखेडा गावाजवळ असलेल्या शेतात गेले होते,सायंकाळी हिवरखेडा कन्नड रस्त्यालगत असलेल्या शेतात त्यांचा मृतदेह शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना दिसून आला त्यांनी तत्काळ जाधव यांच्या नातेवाईकांना माहिती दिली नातेवाईकांच्या मदतीने त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपेश माटे यांनी तपासून मृत घोषित केले,
धारसिंग जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,आई,वडील, भाऊ असा परिवार आहे. कन्नड शहर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद घेण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल एस.पी.आटोळे हे करत आहे