गंगापूर / संभाजीनगर – चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने जेजुरी येथून खंडोबा देवाची सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे जय मल्हार युवा ग्रुपच्या वतीने पायी चालत आलेल्या खंडोबा म्हाळसा ज्योतीचे फटाक्यांची आतषबाजी व तोफांची सलामी देत भंडाऱ्याची उधळण करत नागरीक व भाविकांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
तब्बल चार दिवस प्रवास करत आलेल्या खंडोबा पायी ज्योतीचे नेतृत्व संजूबाबा गायकवाड यांनी केले.या ज्योतीचे नेवासा बुद्रुकच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत नागरिकांसह विविध तरुण मंडळाच्या युवकांनी स्वागत करत दर्शन घेतले.
यावेळी जेजुरी येथून आलेल्या पायी ज्योत पदयात्रेमध्ये जय मल्हार युवा ग्रुपचे समीर मारकळी, चंद्रकांत कदम, भाऊसाहेब पठाडे,संतोष गायकवाड, राजेंद्र सुरोशे, राजू डौले,युवराज बोर्डे,गोरख बंदिवान, संजय गायकवाड, गणेश तट्टू,गणेश कनगरे, दीपक दुबे,अमोल भाकरे, संजय भाकरे,दीपक उदागे,धनू कुटे,सागर लांडे,कृष्णा जाधव,यश मारकळी,ओम मारकळी,नंदू सुरोशे,सुनील बोरुडे,लक्ष्मण डहाके,राजू बाचकर,गणेश डहाके,तुषार कणगरे,राहुल बाचकर यांचा सहभाग होता
पायी ज्योत पदयात्रेतील युवकांचा उद्योजक नितीनभाऊ उर्फ बाळासाहेब मारकळी यांच्या वतीने पिवळे फेटे घालून व भंडाऱ्याची उधळण करत स्वागत करण्यात आले.यावेळी उद्योजक नितीनभाऊ मारकळी यांच्या वतीने खंडोबा म्हाळसा ज्योतीला हार घालून पूजन करण्यात आले.यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत संजू बाचकर आप्पा बाचकर,पांडू बाचकर,रोहन यादव, नवनाथ मारकळी, चेअरमन संजय मारकळी, पोलीस पाटील दिलीपभाऊ गायकवाड यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
सदरच्या पायी ज्योत मिरवणूकीचा समारोप पुरातन खंडोबा म्हाळसा बाणाई मंदिरात झाल्यानंतर व्यवस्थापक संभाजीराव ठाणगे तर नव्याने बांधण्यात आलेल्या खंडोबा म्हाळसादेवी सच्चीदानंद बाबा,नारदमुनी मंदिराचे अध्यक्ष प्रा.डॉ.मुरलीधर कराळे,धनु काशीद,आदिनाथ डोहळे,आप्पा मारकळी आदींनी ज्योतीचे पूजन करत स्वागत केले.यावेळी दोन्हीही देवस्थानच्या वतीने पदयात्रेतील युवकांचा सन्मान करण्यात आला


















