सोलापूर : सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातील सम्राट अशोक युवक मंडळ संचलित, सम्राट अशोक बालक मंदिर, सम्राट अशोक मराठी विद्यालय, यशोधरा प्रशाला, यशोधरा उच्च माध्यमिक विद्यालय,यशोधरा शिशु अध्यापिका विद्यालय,सोलापूर येथे शालेय क्रीडा सप्ताह उद्घाटन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विमल सुतकर ( सचिवा सम्राट अशोक युवक मंडळ,सोलापूर), प्रमुख पाहुणे मा. अंबादास गायकवाड (सदस्य महाराष्ट्र राज्य कबड्डी महिला संघ असोसिएशन), प्रमुख उपस्थिती- सुबोध सुतकर (प्राचार्य यशोधरा प्रशाला व यशोधरा ज्युनिअर कॉलेज सोलापूर), शिवानंद डुणगे (मुख्याध्यापक सम्राट अशोक मराठी विद्यालय सोलापूर), सुधीर वाघ (क्रीडा शिक्षक), कविता पाटील (क्रीडा शिक्षिका), सुवर्णा भांगे (ज्येष्ठ शिक्षिका) इ. मान्यवरांच्या हस्ते खेळाच्या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहूणे मा.अंबादास गायकवाड यांनी खेळ मनापासून खेळा, नियम पाळा,प्रतिस्पर्ध्याचा आदर ठेवा आणि विजय-पराजय दोन्हीही समतेने स्वीकारा असे सांगितले. कॉलेजचे प्राचार्य- सुबोध सुतकर यांनी खेळातून व्यक्तिमत्त्व घडते आणि आत्मविश्वास वाढतो असे मोलाचे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणामध्ये मा.विमल सुतकर यांनी क्रीडा म्हणजे शिस्त, संयम, संघभावना आणि आत्मविश्वास निर्माण करणारी जीवनशाळा आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर वाघ यांनी केले, सुत्रसंचालन प्रियंका कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शांतिप्रिया गाडेकर यांनी केले.


















