वळसंग – येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील क्रीडा सप्ताह प्राचार्य वीरेश थळंगे व पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.
पहिल्या दिवशी विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके, केंद्रीय मुख्याध्यापक अमिन पटेल यांच्या हस्ते व्हाॅलिबाॅल मैदानाचे पूजन करून क्रीडा ज्योत पेटवून व्हाॅलिबाॅल या सांघिक खेळाने क्रीडा सप्ताहास प्रारंभ झाला.या क्रीडा सप्ताहात खो – खो, कब्बडी, क्रिकेट या सांघिक खेळांसह वैयक्तिक व मनोरंजन खेळांचे आयोजन करण्यात आले होते .
क्रीडा शिक्षक संतोष कस्तुरे व बाळकृष्ण गुंड यांनी योग्य नियोजन करून सर्व क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडले.शेवटच्या दिवशी वैयक्तिक व सांघिक खेळातील विजयी व उपविजयी खेळाडूंना व संघांना विविध शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.या बक्षीस वितरण समारंभास नुमवि शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका नर्मदा मिट्टा व त्यांचे पती नरेश कनकी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर क्रिडासप्ताह यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख तानाजी जमादार, संजयकुमार धनशेट्टी,सिध्दाराम भैरामडगी, निलकंठ कवटगी, सिद्धारूढ हिरेमठ , गंगाधर बिराजदार,बसवराज दुधगी, विरेश थळंगे,प्राध्यापक संतोष शिंदे,प्राध्यापक शरणय्या मसुती,मल्लिनाथ गौडगाव, विजय प्याटी,अजय माणकोजी, शिवराज अष्टगी, शैला निंबाळ, गंगा बागलकोटी,स्नेहा हळगोदे, प्राध्यापिका प्रतिभा तांडुरे, लिपिका राजश्री दुधगी ,लिपिक गौरीशंकर चनशेट्टी,कर्मचारी कट्टेप्पा कोळी, विनोद दुधगी, सुनिता कुर्ले या सर्वांचे सहकार्य लाभले.
सदर क्रीडासप्ताहातील सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्रीमंत भोसले यांनी केले तर आभारप्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख संतोष कस्तुरे यांनी केले.



























