सोलापूर – श्री मल्लिकार्जुन हायस्कूल,हत्तुरे नगर, सोलापूरच्या विद्यार्थ्यांची कोकण येथे शैक्षणिक सहल काढण्यात आली.यासहली मध्ये कोकण मधील विविध किल्ले,धार्मिक स्थळे,समुद्रकिनारे व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला.
कोकण येथील मार्लेश्वरच्या शिवलिंगाचे दर्शन,पावस येथील देवाचे दर्शन,गणपतीपुळे येथील गणेशाचे दर्शन,विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट, इत्यादी प्रेक्षणीय स्थळांना विद्यार्थ्यांनी भेट देत ऐतिहासिक वास्तू,सांस्कृतिक वारसा, निसर्गरम्य स्थळांचा व वातावरणाचा आनंद घेत माहितीही मिळवली.
या सहलीचे आकर्षण म्हणजे आरेवारे,गणपतीपुळे,तारकर्ली या समुद्रकिनाऱ्यांचा विद्यार्थ्यांनी यथेच्छ आनंद घेतला.या सहलीमध्ये विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
ही सहल मा.मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे,प्र.मुख्याध्यापक रमेश दिंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.
ही सहल यशस्वी करण्यासाठी सहल प्रमुख भारत राऊत,गुरूसिद्धप्पा पाटील, गंगाराम घोडके,प्रकाश चिवडशेट्टी,अनिलकुमार गावडे,महेश चिवरे,गणेश कोरे, संतोष हिरेमठ,परमेश्वर चांदोडे,संतोष स्वामी,अमरनाथ कदारे,अनिता हौदे,सुकेशनी गंगोडा,प्रतीक्षा बिडवे,सुनिता गंगोंडा यांनी विशेष परिश्रम घेतले.
























