सोलापूर – सिंहगड इन्स्टिट्यूट,केगाव,सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री मल्लिकार्जुन हायस्कूल, हत्तुरे नगर,सोलापूर चा विद्यार्थी चि.श्लोक अतिश काळे याची भंडारा येथील होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.याबद्दल माजी प्राचार्य वैजिनाथ हत्तुरे यांच्या शुभहस्ते या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब हत्तुरे,अध्यक्ष सिद्धप्पा वरनाळ,मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे,प्रभारी मुख्याध्यापक रमेश दिंडोरे आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




















