सोलापूर – महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉर्ईंग ग्रेड परीक्षेत श्री पंचाक्षरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतून एकूण ४० विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षेला बसले होते.त्यापैकी ३६ विद्यार्थी A ग्रेड, ४ विद्यार्थी B ग्रेड , तसेच एलिमेंटरी परीक्षेला एकूण ३९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २९ विद्यार्थी A ग्रेड ,१० विद्यार्थी B ग्रेड मिळविले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील कलाशिक्षक सिध्दाराम काळे यांचे मार्गदर्शन लाभले .या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.श्री. ष. ब्र. पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी , प्रशालेचे प्राचार्य मल्लिकार्जून माकणे आणि प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पंचक्रोशितील पालक या सर्वांनी अभिनंदन केले .


















