मोहोळ : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था मोहोळ यांच्यावतीने श्री रामदासनवमी सप्ताह सोहळा होणार असल्याची माहिती अध्यक्ष माजी प्राचार्य बाजीराव जोशी व सचिव जयेश आराध्ये यांनी दिली.
या सोहळ्यामध्ये दररोज पहाटे साडेपाच वाजता रामफेरी, दुपारी १२ ते ४ यादरम्यान सामुदायिक “दासबोध पारायण” सायंकाळी ६ ते साडेसात या दरम्यान विविध विषयावर प्रवचने होणार आहेत. सोमवार दि . २ फेब्रुवारी रोजी हेग्रसवंशज विनायक बुवा मोहोळकर यांच्या हस्ते आणि प्राध्यापक बाजीराव जोशी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व श्री समर्थ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूनकार्यक्रमाची सुरुवात होईल याच दिवशीउद्घाटन प्रवचन आहे
दैनंदिन प्रवचनांमध्ये दि.२ रोजी श्री. विनायकराव तथा अरुण बुवा मोहोळकर यांचे “भक्ती मार्ग” दि. ३रोजी दै. सोलापूर तरुण भारतचे उपसंपादक शाम जोशी यांचे “दास सर्वोत्तमाचा”, दि.४ रोजी दत्तात्रय मोकाशी यांचे “श्री समर्थ कृत सोलीव सुख”, दि.५ रोजी सौ .विनया संकेत कुलकर्णी उत्पात यांचे “भक्तीपंथेंची जावे”, दि.६ रोजी बाजीराव जोशी यांचे “दासबोध”, दि.७ रोजी सुयोग केसकर यांचे “उपासनेचा मोठा आश्रयो”, दि.८ रोजी अमित देशपांडे यांचे “तुम्ही देवाचे भजन”, दि.९ रोजी जयवंत समुद्र यांचे “शिष्य लक्ष्मण,” दि.१० रोजी जयेश आराध्ये यांचे “श्रीरामाचा मागोवा”, अशी प्रवचने होतील.
दि.११फेब्रुवारी २०२६ बुधवार रोजी दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी, आरती व नंतर प्रसादाचा कार्यक्रम होईल. तरी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी प्राचार्य दिलीप देशपांडे, एड . अमोल देशपांडे, राजाभाऊ देशमुख,दत्तात्रय कुलकर्णी, भाऊ सारोळकर, सौ अलकनंदा कुलकर्णी, सौ. नंदा देशपांडे,महेश सोवनी आदी परिश्रम घेत आहेत
























