अक्कलकोट : अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून रविवारी प्रस्थान झाली. सदरचा हा सोहळा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २८ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे २९ वे वर्ष असून, या परिक्रमेचा शुभारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, देवस्थानचे मुख्य पुरोहित प.पू.वे.शा.स.मोहनराव गोविंदराव पुजारी यांचे चिरंजीव मंदार पुजारी आणि श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी प.पू अण्णू महाराज पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ पादुकाच्या पूजनाने करण्यात आले.
न्यासाच्या महानैवद्या बरोबर अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी श्रींचे पादुकासह श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महानैवद्य पूजा संपन्न झाली.
महाप्रसादालयात पालखी पुजानंतर न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर व श्री भवानी माता मंदिर येथे पालखी पूजन करून, अन्नछात्रातून राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ, सोन्यामारुती चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड, कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ येथे आरती, श्री मल्लिकार्जुन मंदिर, शिवछत्रपती, शिवाजी महाराज चौक (बस स्थानक) येथील श्री खंडोबा मंदिरातील आरती नंतर सोलापूरकडे पालखी मार्गस्थ झाली. दिनांक १६ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सोहाळे येथे मुक्काम तर मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पालखी सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
या पालखी प्रस्थान सोहळ्यास न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, राजेंद्र लिंबीतोटे, लक्ष्मण पाटील, सुरेशचंद्र सूर्यवंशी, कैलास वाडकर, सायबण्णा जाधव, पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे, प्रा. शिवशरण अचलेर, चंद्रकांत तथा पिट्टू सोनटक्के, वैभव नवले, रामदास तांबे, दिनेश हळगोदे, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, पालखी पुरोहीत संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी, श्रीकांत झिपरे, मंगेश सूर्यवंशी, आबा सूर्यवंशी, आकाश सूर्यवंशी, आकाश गडकरी, गणेश भोसले, प्रशांत शिंदे-साठे, शिवा मंगरुळे, स्वप्नील मोरे, योगेश पवार, अतिश पवार, शुभम सावंत, अनिल गवळी, गोरख माळी, श्री गुरव, रोहित पवार, ज्ञानेश्वर भोसले, गणेश पाटील, विनायक भोसले, बाळासाहेब कुलकर्णी-बबलादकर-देसाई, रमेश हळसंगी, सिद्धाराम कल्याणी, रामचंद्रराव घाडगे, अप्पा हंचाटे, मैनुद्दीन कोरबू, सर्फराज शेख, निखील पाटील, प्रविण घाटगे, गोटू माने, प्रसाद मोरे, संजय गोंडाळ, रोहीत खोबरे, सौरभ मोरे, वैभव मोरे, किरण पाटील, स्वामिनाथ बाबर, वासू कडबगावकर, अप्पू म्हेत्रे, सागर गोंडाळ, महेश दणके, नारायणराव गडदे, दिलीपराव कदम, शंकरराव सुरवसे, खंडेराय होटकर, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, महादेव अनगले, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राहुल इंडे, दत्ता माने, सुमित घाडगे, सचिन स्वामी, मारुतीराव बोरकर, राहुल माने, सागर सुतार, राजाभाऊ पंजाबी, नवनीत पाटील, भरत राजेगावकर, भरत पाटील, प्रीतीश किलजे, सागर जाधव, सागर पवार, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, शरदराव भोसले, शावारेप्पा माणकोजी, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, रमेश हेगडे, सुमित कल्याणी, शिवकुमार स्वामी, श्रीनिवास गवंडी, मल्लिकार्जुन बिराजदार, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, अंकुश पवार, मुन्ना कोल्हे, बसवराज क्यार, भिमाशंकर कामशेट्टी, महेश भोसले, श्रीशैल कुंभार, संभाजीराव पवार, पप्पू कोल्हे, संजय बडवे यांच्यासह भक्तगण सेवेकरी, वारकरी, कर्मचारी आदीजण उपस्थित होते.
*अपूर्व संधी :* श्री समर्थ स्वामींच्या साधू-संतत्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येऊन तद्वत त्यांच्या भाक्तींची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जिवन संपन्न बनत आहे. श्री स्वामी समर्थांची पालखी आपल्या गावी येत आहे. या योगे श्री स्वामी चरणी तन-मन-धनाने निष्ठा व सेवा अर्पण करण्याची ही अपूर्व संधी भक्तांना प्राप्त होत आहे.
सन २०२५-२६ मध्ये ८ महिने पालखी :
पालखी परिक्रमेच्या अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक संतोष भोसले-९८२२८१०९६६, ८५५८८५५६७५ यांना संपर्क करण्याचे आवाहन न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले आहे. सदर पालखी परिक्रमा ही ८ महिने महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह दिनांक १५ जुलै २०२५ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत विसावणार आहे.



















