अक्कलकोट – श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वटवृक्ष मंदिरातील गाभाऱ्यात असलेली स्वामींची प्रसन्न भावमुद्रा पाहून मी ही श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त बनलेलो आहे.
या माध्यमातून श्री स्वामी समर्थांची भक्ती श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरिता येण्यास नेहमीच प्रेरित करीत असल्याचे मनोगत सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा उत्तर सोलापूर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले. आज आमदार विजयकुमार देशमुख आणि सोलापूर
श्री सिद्धेश्वर देवस्थानचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन व दर गुरुवारी मंदिरात संपन्न होणाऱ्या श्रींच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी वटवृक्ष मंदीरात आमदार विजयकुमार देशमुख व सोलापूर श्री सिद्धेश्वर देवस्थानचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख बोलत होते. पुढे बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती येथे येण्यास प्रेरित करीत असल्यामुळे येथे वेळ मिळेल तेव्हा येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस व्यक्त केला. वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आदरतिथ्यामुळे समितीचे प्रमुख महेश इंगळे यांचे विशेष आभार मानले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश हिंडोळे, माजी नगराध्यक्ष तथा अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, काशिनाथ इंडे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आमदार विजयकुमार देशमुख, सिद्धेश्वर देवस्थानचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांचा सत्कार करताना चेअरमन, नगरसेवक महेश इंगळे, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, नगरसेवक महेश हिंडोळे व अन्य भाविक भक्त दिसत आहेत.

























