सोलापूर – दाजीपेठेतील श्री वेंकटेश्वर मंदिरात श्री वेंकटेश्वर भगवंताच्या उत्सव मूर्तीस आज ५३ वे ब्रम्होस्त्वात चक्रस्नानम् अभिषेक आणि सूर्यप्रभा वाहन पालखी सेवा हा धार्मिक विधी संपन्न करण्यात आले. तर सायंकाळी पुष्प यागाम होमहवन महापूर्णाहुती व वसंतोत्सवम कार्यक्रमाने सांगता समाप्ती झाली. गेल्या सहा दिवसापासून चाललेल्या या धार्मिक विधीची सांगता होत असल्याने भाविकांमधून भगवंताच्या चरणी नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, विश्वकल्याणासाठी भगवंताचा हा ब्रह्मोत्सव दक्षिणात्य धार्मिक परंपरेनुसार विधिवत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंदिरात सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर श्रींच्या उत्सव मूर्तीस चक्रस्नानम् हा धार्मिक विधी संपन्न करण्यात आला. त्यानंतर मंदिरात भाविकांची श्रीच्या दर्शनासाठी गर्दी झाली. यावेळी मंदिराचे सारे वातावरण प्रकाशमय आणि चैतन्यमय बनले होते.


















