अक्कलकोट – तालुक्यातील श्रीक्षेत्र गौडगाव हे जागृती मारुती मंदिरामुळे देशात प्रसिद्ध झाला आहे. या देवस्थानाला शासनाकडून ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणार आहे.तसेच या गावाला गत वैभव प्राप्त होण्यासाठी विविध विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही,अशी प्रतिपादन आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव (बु) येथे पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीकांत खानापुरे होते.याप्रसंगी योगीराज हिरेमठ, वीरभद्र सलगरे, गिरमल गंगोडा, विजयकुमार पाटील, श्रीशैल्य बनसोडे, सिद्धाराम म्हेत्रे, महंतेश पाटील, उत्तमराव वाघमोडे, प्रकाश सनकळ, प्रकाश मेंथे, रेवणसिद्ध कुंभार, सिद्धाराम आतनूरे आदी उपस्थित होते.सुरुवातीला आमदार कल्याणशेट्टी यांची गावाच्या वेशीपासून मल्लिकार्जुन मंदिर, लक्ष्मी मंदिरापर्यंत बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. दरम्यान, गौडगाव (बु) येथे धनत्रयोदशीच्या शुभदिनी मल्लिकार्जुन मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन (रक्कम १६ लाख) करत विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यात गौडगाव ते शिवगोंड तांडा एक कोटींचा डांबरीकरण रस्ता, गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ते कुंभारवस्ती डांबरीकरण ३५ लाख, स्मशानभूमी मुख्य रस्ता १० लाख, बसवनगर रस्ता काँक्रिटीकरण २० लाख, अंगणवाडी बांधकाम १० लाख, झोपडपटी, धनगरवस्ती, मागास वस्ती, सिमेंट रस्ता आदी कामांचे लोकार्पण आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
दरवर्षी पावसाळ्यात ओढयाला पाणी येऊन गावाचा संपर्क तुटतो, त्यामुळे बसवनगर येथील ओढ्याची उंची वाढवणे, गौडगाव ते इंद्राळ रस्त्याचे डांबरीकरण, गौडगाव ते जेऊर रस्ता डांबरीकरण करणे, गौडगाव ते कल्लहिप्परगे रस्ता डांबरीकरण, गौडगाव ते नाविंदगी रस्ता डांबरीकरणासह देगाव एक्सप्रेस जोड कालव्याचा लाभ गौडगाव परिसरातील शेतकऱ्यांना मिळून द्यावा अशी मागण्या ग्रामस्थांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे निवेदन दिले. याप्रसंगी सूत्रसंचालन सिद्राम वाघमोडे, नंदू वाघमोडे यांनी केले तर आभार प्रकाश मेथे यांनी मानले.