तामसा / नांदेड : तामसा येथील पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूलची ९ व्या वर्गातील विद्यार्थीनी क्षिरजा अमोल तामसेकर ही डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेकडून घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून लातूर विभागात श्रीरजा पात्र ठरली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळेतील नऊ विद्यार्थ्यांपैकी ती एकमेव पात्र ठरली आहे .
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान दृष्टिकोन व ज्ञान वाढवण्यासाठी ही स्पर्धा राज्यस्तरावर होत असते. या यशाबद्दल मंगळवारी (ता. १६) येथील आयुर्वेदिक दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थी विज्ञान स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे प्रमाण वाढणे समाधानकारक असल्याचे मत डॉ. बोंदरवाड यांनी व्यक्त केले.
यावेळी औषध निर्माण अधिकारी संजीवनी पारधी,अमोल तामसेकर,प्रभांजली धानोरकर उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक देविदास अक्कमवाड, शिक्षक गिरीश सुरकुटवार यांनी तिचे अभिनंदन केले.



























