माहूर : नवी आबादी,माहूर येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक शेषराव पाटील यांची शालेय विद्यार्थ्यांना रास्त दरात, दर्जेदार व वेळेवर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असलेल्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे अर्थात बालभारतीवर समीक्षण सत्रासाठी निवड झाली आहे. बालभारतीचे विषेशाधिकारी, मराठी श्रीमती सविता अनिल वायळ यांनी पत्रकाद्वारे याबाबत त्यांना कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) ही महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे, जी २७ जानेवारी १९६७ पासून कार्यरत आहे.ही संस्था १ ली ते १२ वी पर्यंतच्या शालेय पाठ्यपुस्तकांचे संशोधन, अभ्यासक्रम निर्मिती, मुद्रण आणि माफक दरात वितरण करते.पुण्यात मुख्यालय असलेल्या या संस्थेद्वारे राज्यभरात, विविध माध्यमांतून दर्जेदार शिक्षण साहित्य उपलब्ध करून दिले जाते. शालेय अभ्यासक्रम व पुस्तकांचा दर्जा सुधारणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
ही संस्था ‘बालभारती’ नावाने नावलौकिक मिळवून परिचित आहे.अभ्यासक्रम तयार करणे, पाठ्यपुस्तके लिहिणे, चित्रकला व छपाई करून ती वेळेवर वितरीत करण्याचे कार्य करते.मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, सिंधी, कन्नड, तेलगू, बंगाली व तमिळ अशा १० विविध माध्यमांमध्ये पुस्तके उपलब्ध केली जातात. शालेय शिक्षण सुधारण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सतत संशोधन केले जातात.हे मंडळ कोठारी आयोगाच्या शिफारशींनुसार स्थापन झाले आणि शालेय शिक्षणात दर्जा, सुलभता व रास्त दर सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
ज्यामध्ये विषय तज्ज्ञ व शिक्षकांची समिती समीक्षा व निर्मितीचे काम करते.
पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, इ.) पाठ्यपुस्तकांची निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन करते.
समिक्षण व निर्मिती प्रक्रिया,
अभ्यासक्रम निश्चिती राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित असते.विषय तज्ज्ञ, अनुभवी शिक्षक, आणि शिक्षणतज्ज्ञांच्या समित्यांद्वारे आशयाची निर्मिती, संपादन व समीक्षा केली जाते.
शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) २०२५ वर प्रथम मराठी ‘बालभारती’ इयत्ता सहावी पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीचे काम पाठ्यपुस्तक मंडळाने हाती घेतले आहे. या पाठ्यपुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी स्थापित झालेल्या समीक्षण समितीवर एस.एस. पाटील यांची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी योजना दिलीपकुमार बनसोडे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार , गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, बाबुराव माडगे, उत्तम कानिंदे, मिलिंद कंधारे, बालभारती सदस्य रमेश मुनेश्वर, मिलिंद जाधव, मुख्याध्यापक संजीव वाठोरे, भाग्यवान भवरे, डॉ. अरुण धकाते,रणजीत वर्मा, मुख्याध्यापिका ललिता जोशी, फॅन्सी नखाते, लियाकत अली,जमीर शेख, सयद मुजीब आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

























