सोलापूर : जीएसटी आणि आयकर सल्लागारांची राज्यस्तरीय कार्यशाळा शनिवारी गुजराती मंगल कार्यालयात उत्साहात झाली. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्र, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे आणि सोलापूर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष ऍड. पार्थ बधेका आणि महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे चे अध्यक्ष ऍड अनुरुद्र चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. कमलेश नागर, शशांक धोंड (मुंबई), मनोज चिखलीकर (पुणे), आदित्य सुरते (मुंबई), परीक्षित औरंगाबादकर (पुणे), राजेश बट्टू उपस्थित होते.
गुड्स अँड टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष ऍड. पार्थ बधेका म्हणाले, जीएसटी तसेच इतर करांविषयी सविस्तर माहिती मिळण्यासाठी अशा कार्यशाळांची मोठी मदत अशा कार्यशाळांमधून होते. अनेक प्रश्नांची उत्तरे अशा कार्याशाळांमधून मिळतात, असे ऍड. बधेका यांनी सांगितले. यावेळी सी. ए. परीक्षित औरंगाबादकर म्हणाले, जीएसटी आणि आयकर सल्लागारांनी आपल्या दैनंदिन कामकाजात एआयचा वापर करावा. याकरिता नव्याने विकसित झालेले सॉफ्टवेअर वापरावेत. त्यामुळे कामाततील अचूकता वाढण्यास उपयोग होणार आहे. तसेच वेळेचीही बचत होणार आहे, असेही सी.ए. औरंगाबादकर यांनी सांगितले.
या कार्यशाळेत सी.ए. आदित्य सुरते यांनी जीएसटी नोटीसीला उत्तरे कशी द्यावीत, अपीलात बाजू कशी मांडावी याबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले. तसेच सी.ए. संजय व्हनभट्टे यांनी अर्थसंकल्पात आयकरात सुचवलेले बदल आणि नव्याने येणारा आयकर कायदा याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सी. ए. संजय व्हनभट्टे (कोल्हापूर), सोलापूर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. कमलेश नागर, उपाध्यक्ष ऍड. अक्षय अंदोरे, सचिव ऍड. राजेश बट्टू, सहसचिव ऍड. व्यंकटेश दारना, ऍड. रुद्रमणी हिरेमठ, ऍड. रफिक शेख, ऍड. इद्रिस बागवान, ऍड. एम. पी. कोरुलकर, ऍड. संजीवकुमार कोणशिरसगी, ऍड. कोनापुरे, सोलापूर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. कमलेश नागर यांनी प्रास्ताविक केले. ऍड. विनायक नगरकर, ऍड. बालसिंग श्रीचिप्पा आणि ऍड. उज्वल सामलेटी यांनी सूत्रसंचालन तर ऍड. राजेश बट्टू यांनी आभार प्रदर्शन केले.























