सोलापूर – विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्षपदी प्राचार्य श्री. गजानन धरणे यांची नियुक्ती झाली आहे. हस्तिनापूर येथे विहिंप केंद्रीय प्रन्यासी बैठकीत धरणे यांच्या नियुक्तीची घोषणा झाली.
मूळचे सोलापूरचे धरणे हे विद्यार्थी दशेपासून संघ स्वयंसेवक असून अभाविपमध्ये अनेक दायित्व त्यांनी सांभाळले आहे. सध्या ते सोलापुरातील सिध्देश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. धरणे यांच्या नियुक्तीने सोलापूरचा सन्मान झाला आहे.
मेरठ प्रांतातील हस्तिनापूर येथे विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय प्रन्यासी मंडल बैठक़ीचा समारोप शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी झाला. यावेळी अ.भा. स्तरावरील अन्य नियुक्तींच्या घोषणा झाल्या. मुंबई क्षेत्र मंत्री रामचंद रामुका, सहमंत्री प्रा.अनंत पांडे, प.महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, सहमंत्री अॅड.सतीश गोरडे, सहमंत्री नीतीन वाटकर,संघटनमंत्री अनिरूध्द पंडित तसेच अन्य पदाधिक़ारी उपस्थित होते.


















