सोलापूर : भिम प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने दि. 03/11/2025 रोजी सकाळी 12.00 वाजता फडकुले सभागृह, सोलापूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित साधून विविध मंडळांना भिम प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत भगवान गौतम बुद्ध यांचे मुर्ती वापट करण्यात आले व आदर्श शिक्षण संस्थांना, विविध पत्रकार बांधवांना तसेच बचत गट महिलांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
हा कार्यक्रम 1) प्रदीप सिंह राजपूत साहेब (सरकारी वकील), 2) श्री. श्रीशैल मामा हत्तुरे (संस्थापक, बसवेश्वर प्रतिष्ठान) 3) श्री. आप्पासाहेब लंगोटे (पत्रकार कृती समिती, अध्यक्ष), 4) राजशेखर हवशेट्टी (युवा अद्योजक), श्रीनिवास बनसोडे (युवा उद्योजक), बसवराज पनशेट्टी, श्री. अहमद भाई शेख (अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष), विजू (दा) नागमाडे (भिमप्रेमी प्रतिष्ठान : संस्थापक अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते विविध मंडळांना भगवान गौतम बुद्ध यांचे मुर्ती वाटप करण्यात आले. त्यातच विविध शिक्षण संस्थांना, पत्रकार बांधवांना व विविध बचत गटाचे प्रमुख महिलांना आदर्श पुरस्कार देऊन कार्यक्रम पार पाडण्यात आला.
सदर कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष 1) प्रदीप सिंह राजपूत साहेब (सरकारी वकील) यांनी आपले मनोगत व्यक्त करीत “जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे”, “बुद्ध धम्म का करू स्वीकार, मानव मानव एक समान” असे घोषणा करून शांतीचे व माणूसकीचे आवाहन केले.
हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याकामी भिम प्रेमी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमास भिम प्रेमी प्रतिष्ठानचे महिला अध्यक्ष सौ. लक्ष्मी देवकर, चंद्रशेखर पाटील, रोहन सिताफळे, प्रफुल्ल दिलपाक, राहूल कांबळे, अजय आवार, कुमार आंबट, हणमंतु माने, विजय तळभंडारे, आरती हब्बु अदी उपस्थित होते.






















