कोणत्याही क्षणी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग जाहिर करेल, गेल्या कैक वर्षांपासून केंद्रीय स्थरावर अभ्यासपूर्ण आणि ठामपणे सोलापूरचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी लोकसभेत सोलापूरकरांनी निवडुन न दिल्यामुळे सोलापूरचे आतोनात हाल झाले आहे. दैनंदिन पाणीपुरवठा, शहर परिवहन विमानसेवा, उड्डाणपूल, बाह्या वळण, रेल्वे, स्थानिक स्वराज्य संस्थांतील विविध प्रलंबित प्रश्न जे केंद्रीय पातळीवर सहज सोडवता येऊ शकता त्या करिता सोलापूरकरांनी निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या वतीने गेल्या कैक वर्षांपासून काहीच हालचाल दिसत नसल्याने सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांची फसवणूक थांबवा, अभ्यासु आणि सुसंस्कृत उमेदवार द्या असे आवाहन शासकीय विश्रामगृहात सोलापूर विकास मंचच्या वतीने आयोजित बैठकीत सर्व सोलापूरकरांनी सर्व प्रमुख पक्षांना केले.
सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विनंतीवरून केंद्रीय रेल्वेमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत सोलापूरच्या रेल्वे विभागाच्या संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवरच्या बैठकीत मंचचे प्रतिनिधी विजय कुंदन जाधव हे नवी दिल्ली येथे उपस्थित होते.