सोलापूर – सत्यसाई नगर व गीता मंदिर परिसरात कायदा व सुव्यवस्था, वाहतूक कोंडी, बेकायदेशीर कृत्ये तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर महत्त्वाच्या समस्यांबाबत सोडवाव्यात व संबंधित बाबींवर तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
नगरसेवक प्रशांत पल्ली यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक १८ मधील विविध अडचणी व नागरी समस्यांबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. पोलीस आयुक्त यांनी निवेदनाची दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रविकिरण कोडमूर, नागेश कल्पवृक्ष, शंकर कल्पवृक्ष, सिद्राम कल्पवृक्ष, नागनाथ काकेरला, मार्कंडेय ॲडम, व्यंकटेश नराल, नागनाथ कोंकत्ती, दीपक गायकवाड उपस्थित होते.
























