Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रलोभनात्मक वस्तूंच्या वाटप केल्यास कडक कारवाई

तरुण भारतbyतरुण भारत
December 19, 2025
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने प्रभावी नियोजन करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, निवडणूक खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे तसेच मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या रोख रक्कम, दारू व भेटवस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रलोभनात्मक वस्तूंच्या वाटप केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

         या अनुषंगाने आयुक्त तथा  निवडणूक अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक आज  आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत निवडणूक काळातील विविध विभागांच्या जबाबदाऱ्या व समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीस पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू प्रकाश महानवर,

अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त  विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील,

उप विभागीय अधिकारी एस. एम. पडदुणे, उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त गिरीष पंडित,

पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील ,

महावितरण सहाय्यक कार्यकारी अभियंता 

प्रदीप मोरे , जीएसटी अधिकारी मनीष एम. एम,

आयकर अधिकारी विशालकुमार, नगर सचिव प्रवीण दंतकाळे,  बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक

संजीव कुमार,  राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक

जगन्नाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

         बैठकीत सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यात येईल. नागरिकांनीही आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा  निवडणूक  अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले. 

           आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी

रोख व बेहिशेबी आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे, तपास, शोध व जप्तीची कार्यवाही करणे, निवडणूक खर्च नियंत्रणास सहाय्य करणे व निवडणूक यंत्रणेशी समन्वय साधून अहवाल सादर करणे.विक्रीकर उपायुक्त (GST)यांनी बेहिशेबी वस्तू व करचुकवेगिरीवर कारवाई, निवडणूक खर्चाशी संबंधित व्यवहारांवर लक्ष ठेवणे, जप्ती, दंड व तपासाची कार्यवाही तसेच निवडणूक यंत्रणेशी समन्वय व अहवाल. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू वाटप व बेकायदेशीर विक्री रोखणे, परवाना धारकांवर नियंत्रण, जप्ती, गुन्हे नोंद व परवाना संबंधित कारवाई, तसेच निवडणूक यंत्रणेशी समन्वय व अहवाल.शहरतील सर्व बँकानी मोठ्या रोख व्यवहारांवर लक्ष ठेवणे व निवडणूक यंत्रणेशी समन्वय साधून आवश्यक अहवाल सादर करणे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी निवडणूक कर्तव्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच निवडणूकविषयक जाहिरात व सहकार्य करावे, असे स्पष्ट करण्यात आले. 

संशयास्पद हालचालींवर पोलीस प्रशासन नजर ठेवणार 

          या बैठकीत पोलीस आयुक्त कार्यालयाच्या जबाबदाऱ्यांवर विशेष भर देण्यात आला. निवडणूक काळात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणे व आर्थिक बळाचा गैरवापर रोखणे ही पोलीस विभागाची प्रमुख जबाबदारी राहणार आहे.मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी रोख रक्कम, दारू, भेटवस्तू तसेच अन्य प्रलोभनात्मक वस्तूंच्या वाटपावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे, तपास नाके उभारणे, गुन्हे नोंद , जप्तीची कार्यवाही तसेच निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात येईल तसेच निवडणूकीच्या दरम्यान श्री सिद्धरामेश्वर यात्रा होणार असून महापलिका सोबत समन्वयाने काम करू अशी माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले. 

Post Views: 75
Previous Post

सांगोला तालुका पेन्शनर संघटनेच्या वतीने पेन्शनर डे साजरा

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; अवैध मळी वाहतुकीवर व हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; अवैध मळी वाहतुकीवर व हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर कारवाई

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679892

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697