हिंगोली – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोहीम आखली आहे.
त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत दोन किंवा दोन पेक्षा जास्त अवैधंद्यासंदर्भाने गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पकडून पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आणून त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे.
यानंतर सुद्धा सदर आरोपींनी गुन्हा केल्यास त्यांच्यावर हद्दपारची व एमपीडीए अंतर्गत सुद्धा कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तरी कुणीही अवैध व्यवसाय करू नये तसेच त्याच पाठबळ देऊ नये अन्यथा हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहेत.
तसेच जो कोणी लपून-छपून अवैध व्यवसाय करीत आहे त्याची माहिती संबंधित पोलीस स्टेशन किंवा स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथे द्यावी, जेणेकरून अवैध व्यवसाय चालकाविरुद्ध तात्काळ कठोर कार्यवाही करण्यात येईल तसेच माहिती देणाऱ्याचे नाव सुद्धा गोपनीय ठेवण्यात येईल. असे हिंगोली पोलीस प्रशासना तर्फे सांगण्यात आले.




















