तभा फ्लॅश न्यूज/अंबड : अंबड जालना प्रधान मंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जालना या कार्यालया अंतर्गत सन 2023 ते आजपर्यंत अंबड बाजार पासून भालगाव ते खडकेश्वर झालेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तातडीने चौकशी करावी व संबंधित दोषी अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष शाम साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुरोगामी संघर्ष परिषदेचे जालना जिल्हा उपाध्यक्ष रमेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 14 ऑगस्ट 2025 पासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.
दीड वर्षे झाले असता हा रस्ता पूर्णपणे उघडून गेला असून सदर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले. आरोप पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. सदर रस्त्यासाठी पाच कोटी आठ लाख तीस हजाराचा निधी असून या कामाची तातडीने चौकशी करण्यात आली पाहिजे हा रस्ता नऊ किलोमीटर लांबीचा असून अंबड ते भालगाव काँक्रिटीकरण व भालगाव ते खडकेश्वर डांबरीकरण असा आहे.
खडकेश्वर गावापासून शंभर फुट अंतरावर एक नळकंडी पुल आहे परंतु तो नळकंडी पुल नवीन न करता जुन्याच पुलाला दुरूस्ती करण्यात आलेली आहे याची चौकशी न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे.