मंद्रूप – येथील जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळा व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी मेळावा व मंद्रूपमधील गुणवंत अधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. तसेच दहावी व बारावीनंतर पुढे काय ? या विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आला आहे.
मंद्रूप येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नौशाद काझी, सहाय्यक कक्ष अधिकारी प्रशांत वाघमोडे व भूवैज्ञानिक अनिल कुमठाळे यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे राहणार आहेत. तर माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येणार असून सभापती संदीप टेळे , उपसभापती वर्षा पटणे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते व पंचायत समिती सदस्य मळसिध्द मुगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे.
यावेळी मंद्रूपचे अप्पर तहसीलदार विष्णू बुटे यांच्या हस्ते संविधान कोनशिला अनावरण , प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते शालेय अहवाल पुस्तिका प्रकाशन, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते संगणक कक्ष उद्घाटन व गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार यांच्या हस्ते प्रज्ञा चक्षू वाचनालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची केंद्र शाळा व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शिवकालीन ऐतिहासिक व दुर्मिळ शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनात तलवार , कुऱ्हाडी, कटयारी , छुर्या, भाला, दांडपट्टा, वाघनखं, चिलखत व बिछवे या दुर्मिळ शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आला आहे. रविवारी १२ एप्रिल रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रदर्शनातील शस्त्रास्रे पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी सभापती अप्पाराव कोरे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मंद्रूपचे शिक्षण विस्तार अधिकारी आयुब कलबुर्गी राहणार आहेत.
यावेळी माजी सरपंच विश्वनाथ स्वामी यांच्या हस्ते प्रतिमापूजन , माजी सरपंच पिरप्पा म्हेत्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गुरबाळा सनके , केंद्रप्रमुख कल्लप्पा हेळवी व पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्यासह माजी उपसरपंच रमेश नवले, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुदले व मळसिध्द देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, भाजपाचे नेते गौरीशंकर मेंडगुदले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत म्हेत्रे, काँग्रेसचे जिल्हा सचिव महमद शेख व आर के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी प्रदर्शनातील शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी विद्यार्थी, इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी, शिवप्रेमी, महिला , ज्येष्ठ नागरीक यांनी मंद्रूप मुलांच्या केंद्र शाळेला भेट देण्याचे आवाहन शाळेचे मुख्याद्यापक प्रकाश कुंभार गुरूजी व शालेय व्यवस्थापन समीतीच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
























