पंढरपूर – जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतीच विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून प्रत्यक्ष पाहून लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेतला. सभागृहातील कामकाज कश्या पद्धतीने चालते, लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न कसे मांडतात? राज्याच्या विकासासाठी निर्णय कसे घेतले जातात.. यांची मुलांना माहीती देखील सांगितल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या मुंबई भेटी बद्दल माहिती देताना आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले की,प्रत्येकालाच मुंबईचं आर्कषण आहे, आयुष्यात एकदा तरी मुंबईला जावं; हि प्रत्येकाच्या मनातील इच्छा असते. अशा शहरात आल्यावर यातूनच त्यांच्या विचारांना, नव्या स्वप्नांना देखील पंख फुटतात, मोठी ध्येय ठेवण्याची प्रेरणा मिळते आणि आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची मनात जिद्द होते.
या सहलीमुळे विद्यार्थ्यांना नक्कीच दररोजच्या दळणवळणातील गोष्टी विकसित होत असलेली शहरं, लोकशाही व्यवस्था, शासनाची कार्यपद्धती आणि राज्यकारभार याविषयी जवळून समज मिळाली. यावेळी अनेक मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी मंडळींनी भेटी देत गावाकडून आलेल्या सर्वांचं विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्याचे देखील आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
———————
सभागृहाचे कामकाज पाहताना अभिमान वाटतो
पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलं जेव्हा पहिल्यांदाच मुंबईसारख्या मोठ्या शहरात पाऊल ठेवतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत दिसणारा आनंद, उत्साह आणि मोठी स्वप्ने खरोखर प्रेरणादायी वाटतात. गावाकडची मुलं-मुली मुंबईसारख्या ठिकाणी येऊन सभागृहाचं कामकाज पाहतात तेव्हा अभिमानच वाटतो. विद्यार्थ्यांनी मोठं होऊन सभागृहात उच्च अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून कामकाज पहावं अशा शुभेच्छा देखील यावेळी विद्यार्थ्यांना दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
———————
मुलांनी केली जीवाची मुंबई
यासोबतच गावाकडची जुनी म्हण म्हणजे; ‘जीवाची मुंबई’ लहानग्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. त्यांच्या देखील आयुष्यातील कधीच न विसरणारा क्षण असून त्यांच्या आनंदात खूप समाधान मिळाल्याचं देखील आमदार पाटील यांनी सांगितले.
————————
मुंबईत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिल्या भेटी
विद्यार्थ्यांनी मुंबई दर्शनाचा आनंद घेत, बलाढ्य मोठ्या मुंबई शहरातील गेट वे इंडिया, मंत्रालय, राजकीय नेत्यांची शासकीय घर, मोठं- मोठ्या उद्योजकांचे बंगले, सुप्रसिद्ध अभिनेत्यांची घरे, खाऊगल्ली, नरिमन पॉईंट, वानखेडे स्टेडियम अशा अनेक गोष्टी पाहण्यात मग्न झालेले विद्यार्थी. मोठमोठ्या असलेल्या इमारती बघून मुलांच्या चेहऱ्यावर जणू प्रश्नचिन्हच उभा राहिले होते.


























