Friday, February 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘रील हिरो आणि रियल हिरो यातला भेद विद्यार्थ्यांना करता येणं गरजेचे आहे’ – अभिनेते मकरंद अनासपुरे

तरुण भारतbyतरुण भारत
December 26, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : “समाजामध्ये जे घडत आहे ते पाहता आजच्या घडीला मुलांना सुसंस्कृत करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. रील हिरो आणि रियल हिरो यातला भेद करता येण हे विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या रियल हिरोंची जाणीव विद्यार्थ्यांना शालेय जीवनात होणे आवश्यक आहे.” असे विचार सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हिजिएस तरंग २०२५’ या तीन दिवसीय आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून ते बोलत होते. आपल्या जीवनप्रवासाविषयी बोलताना आलेले अनुभव मकरंद अनासपुरे यांनी यावेळी विद्यार्थी व पालकांसामोर मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले “आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे कारण तीच आपली खरी ओळख आहे. देशप्रेम केवळ घोषणेत असण्यापेक्षा ते कृतीत असणे अधिक महत्वाचे आहे आणि समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ही जाणीव असणे गरजेचे आहे.” 

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला दृष्टिहीन टी-२० क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम, माईर्स एमआयटी संस्थेच्या विश्वस्त आणि महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे, राघवेंद्र चाटे संचालक स्ट्रॅटजी अँड ऑपरेशन्स, शाळेच्या शैक्षणिक प्रमुख शीतल वर्मा, मार्केटिंग व ऑपरेशन्स प्रमुख प्रा. के.सी. मिश्रा, पंढरपूर कॅम्पसचे सहसंचालक प्रशासन कर्नल डी. के. उपाध्याय, मुख्याध्यापक शिवाजी गवळी, प्राचार्य डॉ. स्वप्निल सेठ यांच्यासह एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात पंढरपूर, सोलापूर, बार्शी, लोणी काळभोर, कोथरूड, छत्रपती संभाजीनगर, सांगली तसेच नवी मुंबईतील उळवे या आठही शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गायन, नृत्य, वादविवाद, अभिनय यांसारख्या सांस्कृतिक कलाविष्कारांसोबतच धावणे, जलतरण, थाळी फेक, गोळा फेक, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. अंतिम सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी नुकत्याच श्रीलंका येथे पार पडलेल्या दृष्टिहीन महिलांच्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघाच्या उपकर्णधार गंगा कदम यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवासाविषयी बोलताना विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर कोणतेही आव्हान पेलता येते असा संदेश दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या विश्वस्त आणि महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे म्हणाल्या “भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक शिक्षणपद्धतीचा संगम साधत एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर मूल्याधारित शिक्षणावर भर देत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने समाजाच्या भल्यासाठी योगदान देण्याची शिकवण विद्यार्थ्यांमध्ये एमआयटी रुजवत आहे. आमचे ध्येय केवळ ज्ञानदान नसून, सामाजिक जबाबदारीची जाण असलेले सुजाण आणि संवेनदनशील नागरिक घडवणे आहे.” असे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन ओंकार दीक्षित यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजिता चौकेकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post Views: 25
Previous Post

ओंकारचे चेअरमन थेट शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फङात

Next Post

वेळापूर – अकलूज रस्ता व तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी रस्ता रोको

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वेळापूर - अकलूज रस्ता व तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी रस्ता रोको

ताज्या बातम्या

होटगी रोड येथील चेट्टीनाड सिमेंट कंपनीला आग. #breakingnews #solapurnews #solapur #ciment #company

February 19, 2026

पिलीव येथे कोहिनूर इलेक्ट्रिकल्स मधून 1 लाख 25 हजार 500 रु. माल लंपास.#public #solapurnews

February 19, 2026

श्री छञपती संभाजी विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी.#public #viral

February 19, 2026

पिलीव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.#public #marathinews #viral

February 19, 2026

संभाजी आरमार च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शाही पालखी सोहळ्याचे आयोजन

February 19, 2026

प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.#public #viral

February 19, 2026

पानगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी.#शिवजयंती

February 19, 2026

पारध येथे जनता विद्यालयात शिवजयंती व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.#public #marathinews #viral

February 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0687884

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697