कस्तुरबा गांधी बालिका विधालय मधील विद्यार्थ्यांनीना सुसज्ज ग्रंथालय, संगणक व टायपिंग प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा वर्गचा लाभ देण्यात यावा – सोनाली जोंधळे तहसीलदार
मंठा 23. तालुक्यातील आदर्श कस्तुरबा गांधी बालिका विधालय मधील मुलींना संगणकाचे शिक्षण व संगणक टायपिंग च्या परीक्षा ला बसवून त्यांचे भविष्य उज्वल करा असे अहवाहन सोनाली जोंधळे तहसीलदार यांनी शाळा येवस्थापण च्या सभेत मंगळवारी केले आहे.
कस्तुरबा गांधी बालिका शाळा मध्ये सुसज्ज ग्रंथालय शाळेतील प्रत्येक मुलींना स्व स्वरक्षण करण्यासाठी कराटे क्लास सुरू करावे असे त्यानी सभेला मार्गदर्शन करताना सांगितले.
कस्तुरबा गांधी बालिका शाळा ची येवस्थापन ची सभा काल झाली.
अशोक सोळंके गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेतील मुलांना इंग्रजी शिक्षणाची व स्पर्धा परीक्षा चीगोडी लागावी या साठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावे.
या वेळी गट समनवयक के जी राठोड, मुख्याध्यापीका अन्सारी मॅडम, ग्रह प्रमुख सरकटे मॅडम, केंद्रप्रमुख धोत्रे सर, शिक्षण तद्द , लेखा पाल लिपिक बोडले सर, आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक केले तर गटसमनवयक यांनी आभार मानले.