सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्था संचलित विडी घरकुल भागातील मातोश्री जनाबाई बिटला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला इंटरमिजिएट व एलिमेंट्रीपरीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत प्रशालेतील एकूण 27 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यामध्ये निहारिका अंकम, नेहारिका मादगुंडी, श्रावणी मादास, वेनेला चिंताकिंदी, प्रसन्ना मामड्याल व श्रद्धा आडम या विद्यार्थिनीं नी ए श्रेणी घेऊन परीक्षेत यश संपादन केले.
इतर विद्यार्थ्यांनी बी श्रेणी घेऊन या परीक्षेत यश मिळविले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
























