वैराग – विद्यार्थ्यांनी फेसबुक , इंस्टाग्राम , स्नॅपचॅट यासारख्या सोशल मीडियाचा वापर टाळावा . त्याची शालेय जीवनात गरज नाही . तसेच विद्यार्थ्यांनी मोटरसायकलचा वापर टाळावा .आई-वडिलांनी आपल्यासाठी शालेय जीवनात घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवावी . त्यांची मान खाली जाईल असे कोणतेही कृत्य करू नये असे मत बार्शी पोलीस ठाण्यातील निर्भया पथकातील पोलीस कॉन्स्टेबल हनुमत पाडूळे यांनी व्यक्त केले .
बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांचे मार्गदर्शनाखाली शारदादेवी प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर कार्यक्रम ते बोलत होते .
यावेळी निर्भया पथक पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब घाडगे, नम्रता गटकुळ ,भाऊसाहेब महानोर , मुख्याध्यापक संतोष सरवळे , शिक्षिका रंजना शिंदे , शशिकला पाटील आदीसह विद्यार्थी व विद्यार्थिनीं उपस्थिती होते .
कार्यक्रमाचे आभार प्रा .बलभीम लोखंडे यांनी यांनी मानले .
विद्यार्थीनींनी फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट यासारख्या सोशल मीडियाचा वापर टाळावा .अनोळखी व्यक्तीच्या मोटरसायकलवर बसून शाळेवरच्या आवारात येऊ नये .त्रास देणाऱ्या तरुणाची माहिती तात्काळ आई-वडिल व पोलीसांना दया

























