सोलापूर : विद्यार्थ्यांनी कोणताही अभ्यास करताना समजून घेतला पाहिजे. गुरुजी व शिक्षक काय शिकवतात याच्यावर लक्ष दिले पाहिजे. चांगले अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर आणि समाजसेवक व्हावे. मोबाईल, टीव्हीमध्ये वेळ न घालवता अभ्यास करावा. त्याचबरोबर चित्रकला, अवांतर वाचन असा एखादा छंद जोपासला पाहिजे. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानाचे काम कौतुकास्पद आहे. अतिशय सुंदर उपक्रम राबविण्यात येतात, असे प्रतिपादन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ” चित्रकला” स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोलापूर महापालिका उद्यान विभागाचे अजयकुमार चव्हाण, समाजसेवक जवहार मुंदडा, मारवाडी युवा मंचाचे अध्यक्ष आनंद शर्मा, संस्थेचे अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ दृश्यकला विभागाचे धनजय टाकळीकर, दयानंद पटणे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी मांडले तर आभार प्रदर्शन गणेश येळमेली यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष अलकुंटे, दीपक बुलबुले, अभिजीत व्हनकळस, श्रीरंग रेगोटी, महेश भाईकट्टी, सुरेश लकडे, राजेश केकडे, श्रीनाथ श्रीगन, शिला तापडिया, सुजाता सक्करगी, अक्षता कासट, मनुश्री कासट, आर्या लचके, श्रेया लचके, शुभांगी लचके, रुपा कुत्ताते आदींनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेचा निकाल असा
बक्षिस लहान गट (३ री ते ५ वी)-
प्रथम क्रमांक – पृनित बोराडे, द्वितीय – चेचक राका, तृतीय- स्वरा मनाळे, उत्तेजनार्थ- ऋतुजा हुळ्ळे व आयुष दंतकाळे.
मोठा गट (६ वी ते ८ वी) – प्रथम – सृष्टी हराळे, द्वितीय- आरवी राका, तृतीय – ध्रुवी राका, उत्तेजनार्थ- कार्तिकी स्वामी व शर्य हलकुडे आदी.


























