पिलीव – विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे, जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करणे अजिबात अवघड नसल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटे यांनी व्यक्त केले.ते साळमुख येथील आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात बोलत होते.
या भागातील विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करणयास कटीबदध आहे. पालकांनी आपल्या पाल्याला ज्या ठिकाणी ठेवले आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्या पाल्यांची प्रगती वरचेवर पाहणी करणे आवश्यक आहे.मोबाईलचा वापर कमी करावी फक्त पोलीस होणयाचे स्वप्नन बाळगता मोठे धयेय बाळगावे विद्यार्थ्यानी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवावी .
यावेळी फिनिक्स अकॅडमीचे संस्थापक अजित दगडे सरांनीच दहावी ,बारावी ,तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना तसेच बारावीनंतर पोलीस भरती तसेच इतर अनेक क्षेत्रातही विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी आहेत फक्त विद्यार्थ्यांनी स्वत. झोकुन देऊन प्रयत्न करावेत. यावेळेस युनिक अकॅडमीचे निलेश देशपांडे सर यांनीही उपस्थित विद्यार्थी ,पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले .
यावेळेस पिलीव पोलीस ठाण्याचे हवालदार धनाजी झगडे यांनीही मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यानी मोबाईलचा गैरवापर टाळावा ,जीवनामध्ये आपल्याला काही तरी व्हायचे आहे हा उद्देश ठेवुन प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत ,पालकांनी आपला पाल्य काय करतो याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.यावेळेस पोलीस दिलीप माने यांनीही मार्गदर्शन केले तसेच सुञसंचालन केले.
यावेळेस पिलीव परिसरातील दहावी ,बारावीमधील तसेच पदवीधर विद्यार्थी ,पालक मोठया संख्येने शिबीरास उपस्थित होते.सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटेसाहेब यांनी केले. फोटो _ साळमुख येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटेसाहेब .
 
	    	 
                                




















 
                