सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या १४ विद्यार्थ्यांनी विविध मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्ञ विद्यापीठ लोणेरे (रायगड) अंतर्गत शेळवे (ता.पंढरपूर) येथे घेण्यात आलेल्या मैदानी थाळी फेक स्पर्धेत शेखर लवटे प्रथम, सायली वाघमोडे तृतीय, शंभर मिटर धावणे स्पर्धेत सिद्धार्थ उपासे द्वितीय, दोनशे मिटर धावणे स्पर्धेत धनश्री बजबळकर व दिड हजार मिटर धावणे स्पर्धेत सोहम आसबे तृतीय, पाच हजार मिटर धावणे स्पर्धेत उमेश मासाळ द्वितीय, रिले धावणे स्पर्धेत ४×१०० मुलांच्या स्पर्धेत द्वितीय आणि मुलींच्या स्पर्धेत तृतीय, गोळा फेक स्पर्धेत सोनम पाटील तृतीय व भालाफेक स्पर्धेत द्वितीय, निकिता शिंदे तृतीय, तिहेरी उडी स्पर्धेत कोमल जगदाळे तृतीय क्रमांक प्राप्त करून यश मिळविले.
याशिवाय रिले याखेळात मुलांमधील गटात संकेत कारंडे, सिद्धार्थ उपासे, बाळासाहेब शिंदे, सुयश ढाकळे, विश्वास कोरे तसेच मुलींच्या गटात प्रतिक्षा होळकर, नेहा जाधव, धनश्री बजबळकर, कोमल जगदाळे, पुर्वा इनामदार, पुजा शेंडगे यांनी सहभाग घेऊन मेडल प्राप्त केले आहे. या स्पर्धेसाठी क्रिडा शिक्षक मोहन वाघमारे, बिरा वगरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेच्या अध्यक्षा नीलवर्णा रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ.अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा.प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर, पाॅलिटेक्निकचे प्राचार्य तानाजी बुरूंगले यांनी अभिनंदन केले.

















