अकलूज – यशवंत नगर येथील लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या तब्बल २८ विद्यार्थिनींनी मिळवली A श्रेणी कला संचालनालय महाराष्ट्र राज्य वतीने शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा मध्ये शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर चा निकाल *100%* लागला.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी प्रशालेतील एकूण ३७ विद्यार्थिनी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण ३७ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या व या सर्वच्या सर्व ७४ विद्यार्थिनी पास झाल्या,प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला . *कु.तृप्ती काळे ,अनुप्रिया गाडे ,अनुष्का खुडे ,दामिनी यादव जानवी जगदाळे, निशिगंधा तोरसकर, नियती खुडे ,परिणीती कोयले, ऋतुजा कांबळे ,समृद्धी ठवरे ,समृद्धी करगळ, शांभवी चव्हाण ,श्रद्धा राऊत ,तेजल लोखंडे या विद्यार्थिनी एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत ‘ *अ* ‘ श्रेणी ने उत्तीर्ण** *झाल्या.व कु.आरती ननवरे ,अहिल्या काळे ,ऐश्वर्या काळे ,अंजली खरात, अनुष्का कोकाटे, अयोध्या मदने, भावना रणदिवे ,दिया माने, रुद्राक्षी काळे ,सई रणनवरे, तेजश्री ननवरे, वैष्णवी सुळे ,विद्या माने ,विशाखा बुरुटे या विद्यार्थिनी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत अ श्रेणीत* * पास झाल्या .एकूण *28* विद्यार्थिनी या *अ* श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या .21 विद्यार्थिनी *ब* श्रेणीमध्ये व 25 विद्यार्थ्यांनी क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या .सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक मा.श्री.जयसिंह मोहिते- पाटील,संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.संग्रामसिंह मोहिते- पाटील,संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या सभापती मा. कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव मा. श्री.अभिजीत रणवरे , मा.श्री.खराडे साहेब तसेच प्रशाला समितीचे सर्व सदस्य,मुख्याध्यापिका सौ. अनिता पवार मॅडम यांनी यशस्वी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन केले.यशस्वी सर्व विद्यार्थिनींना प्रशालेचे चित्रकला शिक्षक श्री.विशाल लिके यांचे मार्गदर्शन लाभले



















