बार्शी – सोजर इंग्लिश स्कुलचे विद्यार्थी हे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करतातच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सोजर इंग्लिश स्कुलचा यशवंत विद्यार्थी मास्टर अभय शशिकांत जाधव याची इंडियन नेव्हल ऍकॅडमीमध्ये अव्वल गुण संपादित करुन A+ रँक मिळवून इंडियन नेव्हीमध्ये अधिकारी पदावर नेमणूक झाली आहे.
अभयचे प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण सोजरमध्ये झाले असून त्याचे वडील श्री. शशिकांत जाधव हे देखील भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. देशाच्या सेवेत रुजू होतानाचे त्याचे हे यश संस्थेसाठी, प्रशालेसाठी नक्कीच गौरवास्पद आहे.
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री. अरुणदादा बारबोले, सुपरवायझर उमाकांत राऊत यांनी अभयचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्याध्यापक संदिप पोळ व सर्व शिक्षकवृंदाच्यावतीने अभयचे अभिनंदन आणि पुढील यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा.



























