सोलापूर – जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय शहरस्तरीय विविध सांघिक व वैद्यकीय स्पर्धेत यश संपादन केले आहे.
शालेय शहरस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक यश संपादन
यशस्वी खेळाडू अनिष्का टोणपे, ,विद्या कुर्ले,प्रणिता पवार,, विशाखा गुमटे , ईश्वरी शिंदे, अपूर्वा शिंदे श्रेया इंगळे यांचा समावेश होता . तसेच 14 व 17 वर्षाखालील सक्याश स्पर्धेत कु.अनुष्का केत ,कु दिव्या कसबे व अलोक फाळके यांने यश संपादन केले आहे. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात ज्युदो, तायक्वांदो स्पर्धेत चि.जयेश माने यांने प्रथम क्रमांक पटकावला.
14 वर्षे मुलीच्या वयोगटात रोल बॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक यश संपादन केले.
19 वर्षाखालील मुलांच्या गटात रोल बॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक.
सोलापुरात व महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन व द सोलापूर शहर बॉल बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत हर्षवर्धन पाटील, सुमित दळवी, संविधान मसलखांब यांची निवड झाली होती.तसेच अहिल्या नगर येथे झालेल्या राज्यस्तरीय असोसिएशन आट्यापाट्या स्पर्धेसाठी अनुष्का केत, प्रिया शिंदे यांची निवड झाली होती.
शालेय शहरस्तरीय तायक्वोदो स्पर्धेत चि.रूद्र जगदाळे यांने तृतीय क्रमांक यश संपादन केले.
त्यांच्या या यशाबद्दल श्राविका संस्थेचे सचिव यतीन शहा, विश्वस्त देवई शहा, विश्वस्त करणं शहा, प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, वरिष्ठ दिप्ती शहा, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी हार्दिक अभिनंदन केले.
या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांचे मार्गदर्शन लाभले.




















