सोलापूर – जिल्हा किशोर व किशोरी खो- खो संघाच्या कर्णधार व उपकर्णधारपदी अनुक्रमे यश कदम व यश खेडेकर आणि ऋतुजा सुरवसे व रिया चव्हाण यांची निवड सोलापूर ॲम्युचर खो खो आसोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड यांनी जाहीर केली.
वडाळा मुंबई येथे २५ ते २८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ३९वी किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्ह्याचे दोन्ही संघ रवाना झाले. या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर किशोर गटाचे लोकविकास विद्यालय वेळापूर (ता. माळशिरस) येथे झाले. या संघास आमदार उत्तमराव जानकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपसरपंच जावेद मुलाणी, उद्योजक राजू शिंदे आदी उपस्थित होते.
किशोरी गटाचे शिबिर ह. दे. प्रशालेच्या मैदानावर झाले. या संघास सोलापूर ऑम्युचर खो खो आसोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, पंच मंडळ सदस्य अजित शिंदे, तांत्रिक समिती सचिव शिवशंकर राठोड आदी उपस्थित होते.
संघ ः किशोर ः संस्कार उपासे, यश खेडेकर, वेदांत भोसले, पवन जाधव (आदर्श, शेवते, ता. पंढरपूर), तुषार कोरे, चन्नवीर मंठूर, विनायक स्वामी (ए.एम.डोणज, मंगळवेढा), स्वप्नील गुंड (खंडोबाची वाडी, मोहोळ), प्रीतम पवार (दिनबंधू मंद्रूप), सार्थक साळुंके (उत्कर्ष), आदित्य ढेरे, सार्थक काळे (न्यू सोलापूर), यश बनसोडे, यश कदम (लोकविकास वेळापूर), श्रेयश जाधव (मरवेड, मंगळवेढा). प्रशिक्षक : अजित बनकर, व्यवस्थापक : आनंद जगताप.

























