Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून वेळेत ऊस बिल अदा – बबनराव शिंदे

तरुण भारतbyतरुण भारत
December 6, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. १ (पिंपळनेर) आणि युनिट नं. २ (करकंब) यांचा सन २०२५–२६ चा गाळप हंगाम सुरळीतपणे सुरू असून, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ अखेर गाळपास आलेल्या ऊसास प्रति टन २,८५० रुपये प्रमाणे पहिला हप्ता ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

चालू हंगामातील गाळपाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आजअखेर युनिट नं. १ पिंपळनेर येथे ५,४१,४२५ मे. टन, तर युनिट नं. २ करकंब येथे १,९०,०२८ मे. टन असे एकूण ७,३१,४५३ मे. टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. यापूर्वी २० नोव्हेंबरअखेर गाळपास आलेल्या ऊसाचे बिल बँकेत वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर २१ ते ३० नोव्हेंबर या दहा दिवसांच्या कालावधीतील ऊस बिलही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, यासाठी ५३ कोटी १४ लाख रुपयांची अदायगी करण्यात आली आहे.

दिनांक १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीतील एकूण ऊस बिलापोटी १८६ कोटी ८३ लाख रुपयांचे भुगतान करण्यात आले आहे. मागील चार गाळप हंगामांपासून दर दहा दिवसांनी ऊस बिल देण्याची परंपरा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने जपली असून, यंदाही हीच कार्यपद्धती यशस्वीरीत्या सुरू ठेवण्यात आली आहे. वेळेत ऊस बिल व तोडणी-वाहतूक बिले मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या कारखान्यावर दृढ विश्वास असून, मोठ्या संख्येने शेतकरी आपला ऊस याच कारखान्याकडे देत आहेत.

कारखाना व्यवस्थापनाने चालू हंगामासाठी युनिट नं. १ कडे २० लाख मे. टन व युनिट नं. २ कडे ५ लाख मे. टन असे एकूण २५ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत सर्व सभासद व ऊस पुरवठादारांनी केलेल्या सहकार्यामुळे हंगाम सुरळीत सुरू आहे.

सन २०२५–२६ च्या उर्वरित गाळप हंगामातही सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यासच पुरवठा करून गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मा. बबनराव शिंदे यांनी केले आहे.

Post Views: 58
Previous Post

लक्ष्मण शास्त्री जोशी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त सुनिलकुमार लवटेंचे व्याख्यान

Next Post

बीजीएसच्या प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बीजीएसच्या प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन

ताज्या बातम्या

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

युवा पॅंथर संघटनेच्या वतीने नूतन महापौर उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला.#सोलापूर #महानगरपालिका

February 14, 2026

नॅबच्या दिव्यांग मुलांनी मिळवले यश.#viral #marathinews #public #popular #दिव्यांग

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679640

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697