अंबड / जालना – कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कारखान्याचे युनिट नं.१ अंकुशनगर व युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरीकडील कोपीतळामध्ये परजिल्हयातून ऊस तोडीच्या निमित्ताने आलेले ऊस तोड मजुर, महिला व त्यांच्या नातेवाईकांचे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर शुक्रवार, दिनांक २१/११/२०२५ रोजी घेण्यात आले. आरोग्य तपासणीनंतर औषधी, महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. शिबीरास ऊस तोड मजुर व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कारखान्याचे दोन्ही युनिटवर माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून आरोग्य केंद्र सुरु केलेले आहेत. यामधून ऊस तोडीच्या निमित्ताने आलेल्या मजुर, महिला व त्यांच्या नातेवाईकांवर नियमतीत औषधोउपचार करण्यात येतात. शासनाच्या सुचनेप्रमाणे ऊस तोड मजुर, महिलांसाठी आवश्यक त्या सर्व सोई सुविधा कारखान्यामार्फत पुरविण्यात येतात. ऊस तोड मजुरांची सर्वतोपरी काळजी घेण्याचे काम कारखान्याने केले असून यापुढेही हे काम कारखाना करणार आहे.
याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र, शहागड व तिर्थपुरी येथील वैद्यकिय अधिकारी, वैद्यकीय पथक, अंगणवाडी सेविका, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, वैद्यकीय अधिकारी, केन मॅनेजर, मुख्य शेती अधिकारी, उप शेती अधिकारी, ऊस विकास अधिकारी, सुरक्षा अधिकारी, केनयार्ड सुपरवायझर, शेती विभागातील कर्मचारी, ऊस तोड वाहतुक मजुर व महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.



















